दि. 28 व 29 नोव्हेंबर, 2022 पासून नव्याने समाविष्ठ खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 

दि. 28 व 29 नोव्हेंबर, 2022 पासून नव्याने समाविष्ठ खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 

 

गडचिरोली, दि.25 : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नव्याने समाविष्ट झालेले खालील क्रीडा स्पर्धेचे आयोजन पुढील प्रमाणे दिलेल्या तारखेनुसार करण्यात येत आहे. करीता जिल्ह्यातील सदर क्रीडा प्रकारात प्राथमिक प्रवेशिका नोंदणी केलेल्या शाळांनी पुढील स्पर्धा कार्यक्रमाप्रमाणे आपले खेळाडू / संघ स्पर्धास्थळी उपस्थित ठेवावे. आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल क्रिकेट,मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो बॉक्सींग,रोप स्किपींग, सिलंबम,वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग त मार्शल आर्ट या क्रीडा स्पर्धा दि. 28/11/2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन आयोजीत करण्यात येणार आहे तसेच कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुन दो, फुटसाल, कॉर्फबॅाल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट या क्रीडा स्पर्धा दि. 29/11/2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन आयोजीत करण्यात येणार आहे. तरी उपरोक्त सर्व खेळाच्या संघांनी स्पर्धेच्या प्रवेशयादीसह स्पर्धेच्या दिवशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थित राहावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.