वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

गडचिरोली, दि.19: दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. बिलोलीकर, से. नि. विभागीय वन अधिकारी तसेच श्री. बावस्कर, उप वन अभियंता हे होते. तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी केली. प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास लाभलेले श्री. बिलोलीकर से.नि. विभागीय वन अधिकारी तसेच श्री. बावस्कर, उप वन अभियंता, आशिष घोनमोडे यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांचे जीवनाबद्दल, त्यांनी त्यांचे जीवनात केलेल्या अमुल्य कार्याबद्दल व देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल महत्वाची माहिती सांगितली. श्रीमती इंदिरा गांधी यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी वनविभागातील वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व वनसंवर्धन अधिनियम 1980 असे महत्वाचे कायदे हे त्यांचे कार्यकाळातच अस्तित्वात आणून पर्यावरण संतुलनाचे अमुल्य अशी कामगिरी केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन राहुल काचमवार, लिपीक यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्वश्री रायपूरे, लेखापाल, संदिप कांबळे, प्रशांत साळवे, लिपीक, श्री. गावळे, श्री.मेश्राम, श्री गराडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.