मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकरीता 28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार – तहसिलदार दिपक कारंडे

मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकरीता 28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार – तहसिलदार दिपक कारंडे

भंडारा, दि. 16 : मोहाडी तालुक्यातील माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या अकोला, आंधळगाव, बच्छेरा/फुटाळा, बेटाळा, भोसा/टाकळी, बिडसितपार, बोंद्री/घोरपड, बोरगावमुं, बोथली/पांज, राबोरी, चिचखेडा, चिचोली, देऊळगांव/बिटेखाडी, देव्हाडा/खुर्द, ढिवरवाडा, धोप, धुसाळा, डोंगरगाव, एकलारी, हरदोलीझं, हिवरा, जांब, कांद्री, कान्हाळगाव, करडी, काटेबाम्हणी, काटी, खैरलांजी, खमारी बुज, खुटसावरी, कुशारी, महालगाव/मोरगाव, मलिदा, मोहगाव देवी, मोहगाव क, दवडीपार, जांभळापाणी, मुंढरी बुज, मुंढरी खुर्द, नवेगाव बुज, नवेगाव धु, नेरी, निलज बुज, निलज खुर्द, पालडोंगरी, पालोरा, पांढराबोडी, रोहणा, सकरला, सालई बुज, सालेबर्डी, सातोना, सिरसोली, सितेपार झ, शिवणी, टाकला, टांगा, उसर्रा, विहीरगाव, वडेगाव, वरठी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता राज्य निवडणूक आयोग यांच्या कडून निवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार आहे.

 

संबंधित ग्रामपंचायती मधील ज्या कोणत्याही उमेदवारास व नागरिकास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरीता राखून ठेवलेल्या जागेवर निवडणूक लढवायची आहे. अशा उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे अर्ज ऑनलाइन भरून आवश्यक दस्तऐवजासह तहसिल कार्यालय मोहाडी येथील निवडणूक शाखेत सादर करावे, असे मोहाडीचे तहसिलदार दिपक कारंडे यांनी कळविले आहे.