जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न्यावे..

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न्यावे…

भंडारा, दि. 4 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, भंडारा येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात (12 वी विज्ञान शाखा) ज्या विद्यार्थ्यांनी 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत विद्यार्थी, पालक व महाविद्यालय यांचेमार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केले होते त्या अर्जदारांचे जात वैधता प्रमाणपत्र (त्रुटीचे प्रकरणे वगळून) तयार झाले असून त्यांनी स्वत: ई-मेल आय डी चेक करून ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र वेळेत काढून घ्यावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे 31 ऑगस्ट 2022 पर्यंतचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, त्रुटीत आहे. अशा विद्यार्थी, पालक यांनी त्रुटीची पुर्तता करण्याकरीता 9 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यलयीन वेळेत येवून करावी. अर्जदारांनी मुळे कागदपत्रे व आवश्यक पुरावेसह हजर राहून त्रुटी पुर्तता करावी असे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.