गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान कायद्यान्वये गुन्हा यावर नोंदवा तक्रार -हेल्पलाईन क्र. १८००२३३४४७५ व www.amchimulgi.gov.in,

गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान कायद्यान्वये गुन्हा यावर नोंदवा तक्रार -हेल्पलाईन क्र. १८००२३३४४७५ व www.amchimulgi.gov.in,

मनपा टोल फ्री क्रमांक 1800 2574 010, व्हाट्सअप क्रमांक 8530006063 

चंद्रपूर २ ऑक्टोबर : गर्भपात व सोनोग्राफी केंद्रांवर अवैधरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे व स्त्रीभ्रूण हत्या करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ व www.amchimulgi.gov.in यावर किंवा मनपा टोल फ्री क्रमांक 1800 2574 010, व्हाट्सअप क्रमांक 8530006063 यावर किंवा https://grievance.cmcchandrapur.com/complaint_registration/add या लिंकद्वारे मनपाच्या तक्रार निवारण ॲपवरही तक्रार करता येऊ शकते.

कोणत्याही जोडप्यास गर्भलिंग चाचणीसाठी प्रवृत्त करु नये किंवा गर्भवती महिलेने गर्भलिंग निदान करुन घेऊ नये. गर्भलिंग निवडीशी निगडीत सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, दवाखाना किंवा प्रयोगशाळा यांच्या विषयी माहिती मिळाली, तर त्या विषयीच्या पुराव्यांसहित मनपा आरोग्य विभागास संपर्क करून तक्रार दाखल करावी.

गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा २००३ कायद्यान्वये गरोदरपणापूर्वी लिंग निवड करणे किंवा गरोदरपणात गर्भलिंग जाणून घेणे गुन्हा आहे. ज्या दांपत्यास एक किंवा दोन मुली आहेत व मुलगा नाही, त्या दांपत्याचा गरोदरपणी गर्भलिंग जाणून घेण्याकडे कल असतो व मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जातो, यास कायद्याने बंदी आहे.

गर्भलिंग जाणून घेणाऱ्या व्यक्तीस दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. गर्भलिंग कोणत्याही पध्दतीने सागणाऱ्या संबंधित डॉक्टरवर या गुन्ह्याचा आरोप सिध्द झाल्यास डॉक्टरला कैद व दंड तसेच वैद्यकिय परीषदेमधील नोंदणी 5 वर्षापर्यत रद्द करण्याची तरतुद आहे. गर्भलिंग सांगणे किंवा जाणून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच हा अजामिनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आपसात संमतीने खटला मागे घेता येत नाही.

स्टिंग ऑपरेशनसाठी बक्षिस योजना :

स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस महानगरपालिका, चंद्रपूर तर्फे न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर सदर गर्भवती महिलेस रु. पंचवीस हजार चे बक्षिस देण्यात येईल.