मनपा तर्फे श्रीगणेशोत्सव उत्सवप्रसंगी कोव्हीड लसीकरणाची विशेष मोहीम

मनपा तर्फे श्रीगणेशोत्सव उत्सवप्रसंगी कोव्हीड लसीकरणाची विशेष मोहीम

सार्वजनिक गणेश मंडळात केले जात आहे लसीकरण

चंद्रपूर ६ सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे श्रीगणेशोत्सव उत्सवप्रसंगी कोव्हीड लसीकरणाची विशेष मोहीम राबविली जात असुन आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक गणेश मंडळातही लसीकरण केले जात आहे.

कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत साजरा केला जात असून 31 ऑगस्टपासून सुरु झालेल्या श्रीगणेशोत्सव कालावधीतही नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता यावा अशी सुविधा महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु ठेवण्यात आलेली आहेत. ३८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्ये विशेष लसीकरण मोहीम आतापर्यंत राबविली गेली असुन ५८९ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत कोव्हीडचा प्रिकॉशन डोस घेण्याचा कालावधीही कमी झालेला असून दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येत आहे. आत्तापर्यंत चंद्रपूर शहरात ५३७९९ नागरिकांनी कोव्हीडचा प्रिकॉशन डोस घेतलेला आहे. यामध्ये त्याचप्रमाणे कोव्हीडचा पहिला डोस घेतलेले २,८७,९३६इतके नागरिक असून २,४३,८६६ इतक्या नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोर्बिव्हॅक्स ही लस प्रिकॉशन डोस म्हणून घेता येईल. कोर्बिव्हॅक्स या लसीला विषम कोव्हीड १९ बुस्टर लस म्हणून मान्यता मिळाली असून ज्या १८ वर्षावरील नागरिकांनी यापूर्वी कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले असतील ते नागरिक ६ महिने किवा २६ आठवडयानंतर कोर्बिव्हॅक्स लस प्रिकॉशन डोस म्हणून घेऊ शकतात.

श्रीगणेशोत्सवामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहावे या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लस संरक्षित कऱण्यावर भर दिला जात असून उत्सवप्रसंगी देखील नागरिकांना कोव्हीड लसीकरणाचा लाभ करून दिला जात आहे. तरी १८ ते ५९ वयोगटातील अथवा त्यापुढील वयाच्या चंद्रपूर शहरातील नागरिकांनी आपला प्रिकॉशन डोस विनामूल्य घेऊन स्वत:ला लस संरक्षित करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश मोहीते यांच्या वतीने करण्यात येत आहे.