13 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

13 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

Ø स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रियदर्शनी सभागृहात आयोजन

चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव तर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) अभियान राबविण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र लढ्याच्या स्मृती आजच्या पिढीच्या मनात कायमस्वरुपी तेवत राहाव्यात, या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत विविध यंत्रणांद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासन, चंद्रपूरतर्फे शनिवार, दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात देशभक्तीपर गितांचा (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण – तरुणी, शासकीय अधिकारी – कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.