शेतकऱ्यांसाठी विधानसचे विशेष अधिवेशन बोलवा बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांची मागणी

शेतकऱ्यांसाठी विधानसचे विशेष अधिवेशन बोलवा

बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांची मागणी

मुंबई, ११ ऑक्टोबर

राज्यात सत्तेवर असलेली महाविकास आघाडी शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचे भासवत आहे. पंरतु,’मविआ’ला शेतकऱ्यांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी शेती सुधारणा कायद्यांविरोधात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून या कायद्यांविरोधात ठराव पारित करावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी सोमवारी केली. नाशिक येथील प.सा.नाट्यगृहात आयोजित संवाद यात्रेच्या कार्यक्रमातून पदाधिकारी,कार्यकर्त्यांना संबोधित करतांना त्यांनी महाविकास आघाडीसह केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.
अतिवृष्टीमुळे राज्याने भोगलेल्या ओला दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची ही वेळ आहे.अशाप्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. पंरतु, सत्ताधारीच बंद पुकारू लागतील, तर शेतकऱ्यांचा वाली कोण राहणार? असा सवाल अँड.ताजने यांनी उपस्थित केला. अस्मानी संकटासह केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्याच्या ‘सुल्तानी’ संकटाखाली पिचल्या गेलेल्या शेतकर्यांना सध्या ‘बंद’ पुकारणाऱ्यांची नाही तर अश्रू पुसणाऱ्या सत्ताधार्यांची गरज आहे, असे मत अँड.ताजने यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचे काम केवळ बसपाच करू शकते, असे देखील ते म्हणाले.
नाशिक ही महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहीली आहे. बाबासाहेबांच्या पावनस्पर्शाने ही भूमी पवित्र झाले आहे. बाबासाहेबांच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाने या शहराला जातीय शक्तींविरोधात लढण्याचे बळ दिले आहे.अशात महामानवाच्या विचारांचा वारसा चालवण्याचे काम मा.बहन मायावती जी करीत आहेत. यामुळे नाशिककरांनी महानगर पालिकेवर निळा झेंडा फडकवण्यासाठी बसपाच्या निळ्या झेंड्याला ताकद दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.आंबेडकरी चळवळीत अखंड निळा झेंडा असलेला एकच पक्ष बसपा आहे, असे देखील ते म्हणाले.

कार्यक्रमात प्रदेश महासचिव इंजि.शांताराम तायडे, राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर, प्रदेश सचिव डॉ संतोष अहिरे,जिल्हा प्रभारी धर्मा जाधव, असिफ भाई पठाण, जिल्हा अध्यक्ष लालचंद शिरसाठ,शहर अध्यक्ष अरुण काळे ,अपर्णा ताई शिरसाठ तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कर्यकर्ते उपस्थित होते.

उत्तरप्रदेशात यंदा बसपाचे सरकारच सत्तारूढ होणाररैना
बहुजन नायक मा.कांशीराम जी यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त लखनऊ मध्ये जमलेल्या अथांग जनसागराने मा.बहन मायावती जी यांच्यावरील विश्वास प्रकट केला आहे. जनतेच्या प्रेमावर मा.बहन जी पाचव्यांदा उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, असा विश्वास प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी व्यक्त केला. लखनऊ मध्ये स्वर्गिय कांशीराम पार्कमध्ये जमलेली गर्दी बघून सत्ताधार्यांची झोप उडाली आहे. बसपासोबत यंदा प्रबुद्ध वर्ग देखील आहे. अशात बहज मायावती जी सर्वसमावेश आणि सर्व हितकारक सरकार बनवून सर्वसामान्यांना गुंडाराज पासून मुक्ती देतील, अशी ग्वाही देत महाराष्ट्रात देखील बसपा विविध महानगर पालिकेत मुसंडीमारत महापौर पदाच्या शर्यतीत राहील, असे रैना म्हणाले.