नेहरू युवा केंद्राद्वारे भव्य तिरंगा रॅली संपन्न

नेहरू युवा केंद्राद्वारे भव्य तिरंगा रॅली संपन्न

भंडारा, दि. 10 : आझादी का अमृतमहोत्सव निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव समिती, नेहरू युवा केंद्र याच्या संयुक्त विद्यमाने शहरात क्रांती दिनानिमित्ताने काल भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन हुतात्मा स्मारक, शास्त्री चौक ते गांधी चौकपर्यंत करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील युवा वर्ग तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात 500 मीटर लांबीचा तिरंगा शहरात फिरवण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासन, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग व नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अतुल गेडाम उपस्थित होते.