स्वनिधी महोत्सव 2.0 येत्या शनिवारला

स्वनिधी महोत्सव 2.0 येत्या शनिवारला

भंडारा दि. 11 : केंद्र व राज्य शासनाने पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबासाठी स्वनिधी महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने 13 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता पासून लक्ष्मी सभागृह, भंडारा येथे स्वनिधी महोत्सव 2.0 चे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी उत्तम पतशिस्त व डिजिटल व्यवहार यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पथविक्रेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या स्वनिधी महोत्सवाचे उद्घाटन वित्त राज्यमंत्री, भारत सरकार डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे.

स्वनिधी महोत्सवात बँकामार्फत कर्ज वितरण मेळावा, डिजिटल प्रशिक्षण, स्ट्रीट फुड फेस्टिवल/ स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री तसेच इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भंडारा शहरात व्यवसाय करणारे सर्व पथविक्रेते, फेरीवाले यांनी स्वनिधी महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासक नगर परिषद भंडारा यांनी केले आहे.