गडचिरोली जिल्हयात भात, सोयाबीन, तूर व कापूस या पिकांच्या पिकस्पर्धेचे आयोजन

गडचिरोली जिल्हयात भात, सोयाबीन, तूर व कापूस या पिकांच्या पिकस्पर्धेचे आयोजन

गडचिरोली, दि.05: पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी उत्पादकतेत भर घालण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन क्षमतेत वाढ या करीता राज्यात कृषी विभागामार्फत पिक स्पर्धा राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2022 करीता गडचिरोली जिल्हयात भात,सोयाबीन,तूर व कापूस या पिकांची पिकस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

तालुका स्तरावर प्रत्येक पिका करीता किमान 10 स्पर्धक भाग घेणे आवश्यक आहे. त्यात सर्वसाधारण व अूनसूचित जमाती करीता स्वतंत्र पिकस्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.त्यासाठी विहित मुदतीत अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी दाखल करावेत व सोबत फीस रु.300/- चे चलन भरणे आवश्यक आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे.पिक स्पर्धा योजने च्या अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी,कृषी अधिकारी,पंचायत समिती यांचेशी संपर्क करावा,असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.