बालकांचे आजार व मृत्यू टाळण्यासाठी अगोदर लसीकरण करा. . .!

बालकांचे आजार व मृत्यू टाळण्यासाठी अगोदर लसीकरण करा. . .!

  • आरोग्य विभागाचे आवाहन

भंडारा दि. 4: बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ ही मोहिम तीन टप्यात राबविण्यात येणार असुन, पहिला टप्पा 7 ते 12 ऑगष्ट या दरम्यान होणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. बालमृत्यू व प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यास या लसीकरणाची मदत होणार आहे. शहरी भागात झोपडपट्टी, ग्रामिण भागात अतिदुर्गम व डोंगराळ जोखीमग्रस्त भागांमध्ये विशेष लसीकरण सत्र आयोजीत करण्यात येणार आहेत.

 तालुकानिहाय विशेष सत्र

तालुक्यातील विशेष लसीकरण सत्र – भंडारा 83 , मोहाडी 47, तुमसर 82, लाखनी 39, साकोली 36, लाखांदूर 34, पवनी 45, हे नियमित लसीकरण सत्र असणार आहेत.

लस दिल्यास या आजारांपासून होईल बचाव.

योग्य वेळी योग्य लस दिल्यास पोलिओ, घटसर्प, काविळ, क्षयरोग, डांग्याखोकला, न्यूमोनिया, श्वसनदाह, धनुर्वात, मेंदूज्वर, गोवर, रुबेला, रातआंधळेपणा आदी आजारांपासून संरक्षण मिळेल.

तीन टप्यात राबविणार मोहिम

पहिला टप्पा – 7 ते 12 ऑगष्ट , दुसरा टप्पा – 11 ते 16 सप्टेंबर, तिसरा टप्पा – 9 ते 14 आक्टोंबर

जिल्हयातील वयोगटानुसार लाभार्थी. 0 ते 1 वर्षे – 3260, 1 ते 2 वर्षे – 2188, 2 ते 5 वर्षे – 479, एकही डोस न घेतलेली बालके – 0

लसीकरण सत्र – 366, गर्भवती महिला – 496,  एकुण टीम – 193, मोबाईल टीम – 140

कधी करावे गर्भवती व मुलांना लसीकरण

 » मुलांना जन्मत: बीसीजी, हिपेटायटिस बी.

» दीड, अडीच व साडेतीन महिन्यात ओपीव्ही, रोटा व पेन्टा.

» दीड, साडेतीन व नऊमहिन्याला आयपीव्ही व पीसीव्ही.

» नऊ महिण्याला व दीड वर्षाला एमआर, जेई व अ जिवनसत्व.

» दीड वर्षाला  ओपीव्ही व डीपीटी, एमआर, जेई व अ जिवनसत्व.

» पाच वर्षाला डीपीटी.

» दहा व सोळा वर्षाला टीडी,

» दर सहा महिण्याला अ जिवनसत्व लसी पाच वर्षापर्यंत दिल्या जातात.

तसेच गर्भवती मातांना धनुर्वात व घटसर्प (टीडी) लसी दिल्या जाते. नोंदणी केल्यानंतर  लगेच टीडीचा पहिला डोस आणि दुसरा डोस एक महिन्याच्या अंतराने दिला जातो. आणि पहिले बाळ तीन वर्षापेक्षा लहान असेल तर केवळ बुस्टर डोस दिला जातो.

            ‘मिशन इंद्रधनुष्य’ या मोहिमेची सर्व तयारी झाली आहे. नजीकच्या सत्राची माहिती हवी असल्यास http://uwinselfregistrotionuot.co-vin.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी, तसेच येथील जवळचे सत्र निवडून लस द्यावी. काहीही अडचण वाटल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. हे लसीकरण सत्र सर्वच शासकिय आरोग्य संस्थेत राहणार आहेत.