आस्थापनांना ऑनलाईन त्रैमासिक अहवाल भरणे बंधनकारक

आस्थापनांना ऑनलाईन त्रैमासिक अहवाल भरणे बंधनकारक

भंडारा, दि. 12 : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती संकलनाचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन त्रैमासिक अहवाल (ईआर-1) नियमितपणे भरणे बंधनकारक आहे.

मार्च-जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती विवरणपत्रे नियमितपणे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व संबंधितांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अद्ययावत माहिती ऑनलाईन पध्दतीने भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. रा. झळके यांनी केले आहे.