जिल्हाधिकारी कार्यालयात 18 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

जिल्हाधिकारी कार्यालयात 18 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वरळी येथे उपलब्ध

मुंबई, दि. 6 : महिलांच्या तक्रार निवारणासाठी सोमवार दि. 18 जुलै रोजी “महिला लोकशाही दिना”चे आयोजन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई येथे सकाळी 11:00 वा. करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

समस्याग्रस्त, पिडीत महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी “महिला लोकशाही दिना”चे आयोजन केले जाते. त्यानुसार जुलै महिन्यातील महिला लोकशाही दिन दि. 18 रोजी होणार आहे.

महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 117, बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – 18 येथे उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.