एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत अर्ज आमंत्रित

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 5 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना सन 2022-23 करिता कृषी, आयुक्त पूणे यांच्या कडून जिल्ह्यास एकूण 177.60 लक्ष रक्कमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर झाला आहे. या योजनेंतर्गत रेफर व्हॅन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, स्थाई/फिरती/विक्री केंद्र, सुटी फुले, पॅक हाऊस, हळद लागवड, मिरची लागवड, प्लास्टिक मल्चिंग, ड्रॅगन फ्रुट लागवड, हरितगृह व शेडनेट हाऊस उभारणी, अळिंबी उत्पादन केंद्र, शेततळे अस्तरीकरण, सामूहिक शेततळे, ट्रॅक्टर, पॉवर स्पेअर, जमीन सुधारणा उपकरणे, पॉवर टिलर 8 अश्वशक्ती पेक्षा कमी, पॉवर टिलर 8 अश्वशक्ती पेक्षा जास्त या घटकांकरिता शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

शेतकरी बांधवांनी उपरोक्त घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाणे यांनी केले आहे.