व्हॉलीबॉल खेळाडू शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलींचे वीस दिवसीय प्रशिक्षण शिबीर

व्हॉलीबॉल खेळाडू शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलींचे वीस दिवसीय प्रशिक्षण शिबीर

चंद्रपूर, दि. 4 जुलै : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भवितव्याचा विचार करून शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलींचे 20 दिवसाचे प्रशिक्षण शिबीर शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी.पांडियन (तामिळनाडू) यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण मिळणार असून विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच भविष्यात या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकेल.

या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील (सेंटर-1, अटॅकर-2, युनिव्हर्सल/ ब्लॉकर-2) असे जास्तीत जास्त 5 खेळाडू मुली ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावी. उंची 175 सेंटीमीटर व त्यापुढे शाळेत शिकत असलेली किंवा नसलेली अशा खेळाडूंनी पुणे येथे प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी चंद्रपूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा व्हॉलीबॉल या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके यांचेशी 9975862469 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.