19 जून 2022 हा जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन

19 जून 2022 हा जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन

गडचिरोली,(जिमाका)दि.17: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हयात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 19 जून 2022 हा जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन म्हणून साजरा करण्यात येतआहे.

जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन पुढील उपक्रम राबविण्यात येत आहे:- सोल्युबिलीटी चाचणी करणे, औषधोपचार करणे, समुपदेशन व मार्गदर्शन:- सिकलसेल आजाराचा प्रभाव आणि प्रसार, आजाराचे दुष्परिणाम,प्रतिबंधाचे उपाय,शासनाच्या सोई सवलती (मोफत रक्तपुरवठा व उपचार,संजय गांधी निराधार योजनेंतर्गत रु.1000/- ची मदत,जीवनदायी योजना इ.) सिकलसेल आजारामुळे होणारे मृत्यू व त्यावरील उपाययोजना या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जनजागृती:- सिकलसेल आजाराबाबत तपासणी,उपचार,प्रसार, व प्रतिबंध तसेच pain crisis बाबत औषधोपचार व आवश्यकते नुसार रक्तसंक्रमण यांची शास्त्रोक्त माहिती देण्यात येणार आहे.प्रतिबंध:- प्रसुतीपूर्व गर्भजल निदान (cvc/Amniocentesis) तपासणी बाबत मार्गदर्शन करणार आहे, असे  आवाहन जि.ए.आ.कु.क.सो. तथा जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद,गडचिरोली यांनी केले आहे.