वक्तृत्व स्पर्धेतून महिला सबलीकरणावर प्रकाश  

वक्तृत्व स्पर्धेतून महिला सबलीकरणावर प्रकाश  

भंडारा, दि. 9 : जागतिक महिला दिनी लाखनी येथील स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभागातर्फे 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सपाटे मॅडम तसेच अध्यक्ष म्हणून डॉ. सुधाकर शेंडे उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरण या वक्तृत्व स्पर्धेत एकूण आठ स्पर्धकांनी सहभाग घेतला, त्यात कु. श्रद्धा तितिमारे हिने प्रथम क्रमांक, कु. सानिका नवखरे हिने द्वितीय क्रमांक आणि कु. वृक्षाली रहांगडाले हिने तिसरा क्रमांक पटकविला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनुराधा खाडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रशेखर देवघरे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. शहारे, प्रा.कापसे, डॉ. भोयर, डॉ. सहारे, डॉ. भैसारे, प्रा. टेंभुर्णे तसेच इतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.