जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

भंडारा, दि. 6 : जागतिक पर्यावरण दिनी जिल्ह्यात नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणास अनुकूल टिकाऊ वाहतुकीचे साधन मुलांसाठी आणि तरूणांसाठी शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याची पध्दत म्हणून सायकल वापरासाठी चालना देण्याकरिता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरूवात शिवाजी क्रीडा संकुल येथुन सुरूवात झाली.

या रॅलीला माजी उपाध्यक्ष आशु गोंडाणे,माजी नगरसेविका जयश्री बोरकर व जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, युवा केंद्राचे हितेद्र वैद्य, भोजराज चौधरी तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तरूण-तरूणी तसेच विद्यार्थी, गृहीणी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.