भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन

भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये

विशेष ग्रामसभेचे आयोजन

भंडारा, दि. 1 : अंतिम प्रभाग रचनेवर प्रभाग निहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागा राखून ठेवल्यानंतर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांच्या जागांचे आरक्षण सोडत निश्चित करावयाचे असल्याने संबंधित ग्रामपंचायतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतमधील मतदार म्हणून पात्र असलेल्या ज्या ग्रामस्थांची विशेष सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असेल त्यांनी नेमून दिलेल्या तारखेला सभेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक अरविंद हिंगे यांनी कळवले आहे.

खरबी, मुजबी, मोहदुरा, साहुली, दवडीपार बे, पिंडकेपार, खराडी, संगम (पु.), पांढराबोडी, दवडीपार बाजार, खमाटा, इंदुरखा, ईटगाव (पु.), गराडा, दिघोरी, टेकेपार (पु.) यांची विशेष सभा 4 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता आहे. तर चिखली, जाख, हत्तीडोई, नांदोरा, कवडसी, कोरंभी, राजेदहेगाव, पिपरी (पु.), सिरसी, मालीपार, कोथुर्णा, खैरी बै, चिखलपहेला, बासोरा, कवलेवाडा, बोरगाव बु. (पु.) यांची विशेष सभा 4 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता आहे.

भोजापुर, परसोडी, गणेशपुर, सिल्ली, आमगाव, ठाणा, सावरी, शहापूर, बेला, खोकरला, केसलवाडा, सुरेवाडा, वाकेश्वर, सालेबर्डी (सि), खमारी, कारधा, दिनांक 6 जून 2022 रोजी 11 वाजता आहे. तर नवरगाव, टेकेपार मा. खैरी पां. तिड्डी, सिंरसघाट (पु), मंडणगाव, डोडमाझरी (टे) यांची विशेष सभा दिनांक 6 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता आहे.