मानव विकास आयुक्त नितीन पाटील घेणार योजनांचा आढावा Ø  जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांची बैठक

मानव विकास आयुक्त नितीन पाटील घेणार योजनांचा आढावा

Ø  जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांची बैठक

 भंडारा, दि. 17 : मानव विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांच्या भौतिक व आर्थिक खर्चाच्या अहवालाबाबत मानव विकास आयुक्तालय, (औरंगाबाद) आयुक्त नितीन पाटील हे उद्या बुधवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांचे जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मानव विकास कार्यक्रम सन 2022-23 नियमित योजना व जिल्हा/तालुका स्पेसिफिक योजनांबाबत प्रस्ताव मागविणे याबाबत चर्चा होणार आहे, असे मानव विकास विभागाच्या जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांनी कळवले आहे.