खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग, सायकलिंग व ॲथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणीकरीता अर्ज आंमत्रित Ø 23 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग, सायकलिंग व ॲथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणीकरीता अर्ज आंमत्रित

Ø 23 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 12 मे: आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग, सायकलिंग व ॲथलेटिक्स या खेळ प्रकाराचे केंद्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.

खेलो इंडिया राज्य निपुणता  केंद्राअंतर्गत शूटिंग, सायकलिंग व  ॲथलेटिक्स या खेळाची निवड चाचणी दि. 30 मे ते 31 मे 2022 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.

यामध्ये ॲथलेटिक्स या खेळात एकूण 18 खेळाडू, सायकलींग 14 व शूटिंग या खेळात 24 अशाप्रकारे खेळाडूंची निवड करण्यात येईल. त्यानुसार संबंधित खेळ बाबींमध्ये खेळनिहाय चाचणी, समितीमार्फत घेऊन गुणानुक्रमे निश्चित केला जाणार आहे. सायकलिंग, ॲथलेटिक्स व शूटिंग या खेळातील राज्यस्तरावर प्रावीण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय सहभाग, प्राविण्य प्राप्त खेळाडू या निवड चाचणीस पात्र राहील. पात्रताधारक व इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणीकरीता विहित नमुन्यातील खेळनिहाय अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी.

याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणी नोंदणीकरिता दि. 23 मे 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अर्ज सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.