मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण नवोदित खेळांडूनी अर्ज करावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आवाहन

मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण

नवोदित खेळांडूनी अर्ज करावे

  • जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आवाहन

भंडारा, दि. 11 : जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळामध्ये इच्छुक खेळांडूना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळावी यासाठी विशेषत: मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन बालेवाडी, पूणे येथे सुरू आहे. त्यात सहभागासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.

मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण पी. सी. पांडीयण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तामिळनाडू यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. यासाठी शाळा व क्रीडा मंडळांमध्ये सराव करणाऱ्या खेळाडू 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावी. खेळाडूंची उंची 175 सें.मी. असणे आवश्यक आहे. या अटींची पुर्तता करणाऱ्या 5 खेळांडूची निवड करण्यात येणार आहे. तरी खेळाडूंनी आपली माहिती 17 मे 2022 रोजी दुपारी 3 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिवाजी क्रीडा संकुल येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.