मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज 30 एप्रिल पर्यंत तातडीने सादर करा

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित

अर्ज 30 एप्रिल पर्यंत तातडीने सादर करा

भंडारा, दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण कार्यालयामार्फत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे 1 हजार 226, फ्रीशिप-66 व राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे 23 असे एकूण 1 हजार 315 अर्ज प्रलंबित दिसून येत आहे. यामध्ये भंडारा-607, मोहाडी-95, तुमसर-71, साकोली-105, लाखनी-109, पवनी-284 व लाखांदूर-44 असे एकूण अनुसूचित जातीचे 1 हजार 315 अर्ज महाविद्यालयाच्या आयडीवर प्रलंबित दिसून येत आहेत. विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाने प्रलंबित अर्जांतील त्रृटींची पुर्तता करुन पात्र अर्ज तातडीने 30 एप्रिल 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलव्दारे मंजुरीसाठी सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 07184-295257 वर संपर्क साधावा.