जिल्ह्यात म्हशींचा बाजार भरविण्यास परवानगी

जिल्ह्यात म्हशींचा बाजार भरविण्यास परवानगी

 

भंडारा, दि. 9 : संपूर्ण राज्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार दिनांक 12 सप्टेंबर 2022 पासून बंद करण्यात आलेले आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्र लम्पी चर्म रोगाने बाधित झालेला आहे. या रोगामुळे गोवंशीय जनावरे बळी पडत आहेत व मर्तुकी सुद्धा होत आहेत.

म्हैस वर्गीय जनावरांमध्ये हा रोग आढळून न आल्यामुळे शासन अधिसूचने नुसार जिल्ह्यात म्हशीचे बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी खालील अटीनुसार जिल्ह्यात जनावरे वाहतुकीस परवानगी दिली आहे.

वाहतुकीकरीता जनावरांचे 28 दिवसांपुर्वी लसीकरण झालेले असावे, गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात Tag नंबर व INAPH पोर्टलवर नोंदणी असावी, जनावरांच्या आरोग्य प्रमाणपत्रावर पशुधन विकास अधिकारी यांची स्वाक्षरी असलेली असावी, जनावरे वाहतूक अधिनियम 2009 मधील नियम क्र.47 अन्वये स्वास्थ प्रमाणपत्र (Proform for Certificate of Fitness to travels cattle) सोबत असावे, जनावरांचा बाजार गोवंशीय जनावरे वगळून भरवावे.