sindewahi I उमेद च्या महिला ग्रामसंघांनी सुरू केले आठवडी बाजार

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर अंतर्गत दि.१६/०२/२०२१ रोजी माऊली महिला ग्रामसंघ देलनवाडी येथे आठवडी बाजार ( रुलर हाट ) सुरू करण्यात आले.
ग्रामसंघातील १९ समूहातील महिलांनी दुकाने लावली त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला, स्टेशनरी, मत्स्यविक्री असे २५ स्टॉल होते. पहिल्याच दिवशी १७ हजार रुची विक्री झाली. प्रत्येक रविवार ला बाजार भरविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले .
या उपक्रमामुळे संपुर्ण गावकऱ्या मध्ये उत्साह दिसून आला व चांगला प्रतिसाद मिळाला सदर आठवडी बाजाराच्या उदघाटन कार्यक्रमाला
उदघाटक – नागराज गेडाम , सभापती समाज कल्याण,तथा सदस्य जि. प.चंद्रपूर व
अध्यक्ष – मंदाताई बाळबुद्धे सभापती,प.स.सिंदेवाही
विशेष अतिथी – कुणाल उंदिरवाडे , गट विकास अधिकारी,पं.स.सिंदेवाही, सरपंच अश्विनी डोंगरवार ,रितेश अलमस्त सदस्य प.स.सिंदेवाही , ताराचंद अर्जुनकार उपसरपंच ग्रा.प.देलनवाडी, रवी बोरकर ग्रामसेवक व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्विते करिता उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक ,ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समन्वयक , सविता उईके प्रभाग समन्वयक ,ग्रामसंघ अध्यक्ष लीनाताई आंनदे ,सचिव सुनीताताई आंनदे, कोशाध्यक्ष सुलभाताई गरमडे, Icrp विशाखा रामटेके, Icrp अस्मिता लेंझे.व ग्राम संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. मयूर खोब्रागडे , सचिन लोधे यांनी सहकार्य केले.