आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित नव तेजस्विनी  महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत  मिशन टीमची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित नव तेजस्विनी

 महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत

 मिशन टीमची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

 

भंडारा, दि. 26 : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मिशन टीमने आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

 

या मिशन टीममध्ये प्रमुख एलिझाबेथ सेंडीवाला, श्रीराम सिंह, विनय तुली, विरेंद्र गर्ग, महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबईचे प्रशासकीय व्यवस्थापक महेंद्र गमरे, उपव्यवस्थापक महेश कोकरे, विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी राजू इंगळे यांच्यासह जिल्हा रेशीम अधिकारी श्री. ढोले, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. सुधाकर झळके, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी सुशील भगत, जिल्हा नियोजन अधिकारी शशी कुमार बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ हे उपस्थित होते.

 

यावेळी माविम भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी सादरीकरण केले. यात विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिला आर्थिक विकास जिल्ह्यातील कामाची माहिती जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिली. जिल्ह्यातील माविममार्फत करण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या कामाची विस्तृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीनंतर साकोली येथील माविमच्या प्रकल्पांना भेट देण्यासाठी मिशन टीम रवाना झाली.