चंद्रपुरातील विविध मशीद परिसरात कोविड लसीकरणास प्रतिसाद

चंद्रपुरातील विविध मशीद परिसरात कोविड लसीकरणास प्रतिसाद

चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध भागातील मशीद परिसरात कोविड लसीकरण शिबीर घेण्यात येत असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चंद्रपूर शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास १६ जानेवारीला प्रारंभ झाला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. मे महिन्यापासून १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना लस दिली जात आहे. शहरात ८५ टक्के नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. लसीकरण मोहीम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  

१७ नोव्हेंबर रोजी बगड खिडकी येथील गौसिया मशीद, प्रकाशनगर, हजरत सय्यद सिव्हिल लाईन, पहलवान शाहसा दरगाह, १८ नोव्हेंबर रोजी नूर मशीद अष्टभुजा वॉर्ड, जामाले मुस्तफा मशीद रयतवारी, कालेशा दरगाह इंदिरानगर, १९ नोव्हेंबर रोजी शाही गुप्त मशीद गंजवॉर्ड, प्रेसिडेंट छोटी मशीद गंजवॉर्ड, अहमदिया मशीद गंजवॉर्ड, जामा मशीद सराफा लाईन, हुदा मशीद रहमतनगर, आयेशा मशीद रहमतनगर, उमर मशीद रहमतनगर, पैगामा ए रजा मशीद घुटकाळा, जामिया अशरफीया, गुलशन ए उलिख एकोरी वॉर्ड, मशीद ए अंजुमन घुटकाळा, सवारी दरगाह नागिनबाग, राजा मुस्तफा मशीद बाबुपेठ, मक्का मशीद इंदिरानगर आदी ठिकाणी लसीकरण घेण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम सुरु राहणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.