महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक


चंद्रपूर, ता. १९ : विविध स्पर्धामध्ये यशस्वी ठरलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वानिमित्त विधी प्राधिकरण चंद्रपूरतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत मनपाच्या शाळांमधील कृणाली बुधबावरे (वर्ग ६वा), निबंध स्पर्धेत त्रिशा दुर्योधन (वर्ग ९वा) यांनी यश प्राप्त केले. हैद्राबाद येथील कराटे स्पर्धेत शितल बंडू मेश्राम (वर्ग ८वा) हिला गोल्ड मेडल मिळाले. त्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी (माध्यमिक) मनोज गौरकार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी कौतुक केले. यावेळी शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत आणि शिक्षकांची उपस्थिती होती.