आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील

प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि.10 नोव्हेंबर: चंद्रपूर प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आदिवासी मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहात सन 2021-22 या सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी swayam.mahaonline.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. दि. 3 नोव्हेंबर 2021 पासून सदर संकेतस्थळ सुरू झाले असून नूतनीकरण तसेच रिक्त जागेवर नवीन विद्यार्थ्यांकडून दि. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

तसेच खास बाब करिता लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत अर्ज करावयाचे असल्यास दि. 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत शिफारशीसह संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावे. असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.