भटक्या व मोकाट कुत्री असल्यास संपर्क साधा

भटक्या व मोकाट कुत्री असल्यास संपर्क साधा

चंद्रपूर, ता. ७ : शहरातील भटक्या व मोकाट कुत्रांचा नागरिकांना होणारा त्रास आणि कुत्र्यांची वाढती संख्या प्रतिबंधित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून मोहीम राबिण्यात येत आहे. आपल्या परिसरात अशी मोकाट कुत्री आढळल्यास  मनपाशी संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याचे चित्र विविध भागांत पहायला मिळत आहे. कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे असते.  ऍनिमल बर्थ कंट्रोल रुलच्या (डॉग्स) नुसार अँटी रेबीज प्रोग्रॅमअंतर्गत चंद्रपूर शहरातील सर्व भटक्या व मोकाट गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कुत्र्यांना अँटी रेबीज लस दिली जाणार आहे. ही लस देण्यासाठी फिरते पथक तैनात करण्यात येणार आहे. आपल्या परिसरात अशी मोकाट कुत्री आढळल्यास स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंदरे (7028882889) यांच्याशी संपर्क साधावा.