गरोदर मातांसाठी कोविड लसीकरण सुरक्षित – डॉ. रियाज फारुकी

गरोदर मातांसाठी कोविड लसीकरण सुरक्षित – डॉ. रियाज फारुकी

भंडारा,दि.02:- गरोदर मातांसाठी व प्रसूती नंतर महिलांसाठी कोविड लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून लसी विषयी मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्यात कोविड-19 चे लसीकरण प्रथम डोज 86 टक्के पात्र लाभार्थी लोकसंख्येच्या प्रमाणात झालेले आहे. तरी पण यामध्ये गरोदर स्त्रिया व प्रस्तुती पश्च्यात माते मध्ये लसीकरणचे प्रमाण अत्यंत कमी आहे. प्रसूती पूर्व व प्रसूती पश्च्यात काळात कोविड-19 लसीकरण करणे हे सुरक्षित आहे व कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. मातेला झालेला लसीकरणामूळे बाळाचेसुध्दा संरक्षण होते. करीता सर्व गरोदर स्त्रियांना लसीकरण करून घ्यावेत. या करीता जवळच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांनी केले आहे.