विद्यार्थि पेटून उठला तर महाराष्ट्र सरकार धराशायी झाल्याशिवाय राहणार नाही – आशिष देवतळे

विद्यार्थि पेटून उठला तर महाराष्ट्र सरकार धराशायी झाल्याशिवाय राहणार नाही – आशिष देवतळे

महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात युवा मोर्चा आक्रमक.

वृत्तसंकलन शंकर महाकाली

बल्लारपुर : महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर शहरात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात युवा मोर्चा कडून आंदोलन घेण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले ज्यामध्ये नगरपालिका चौकामध्ये युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आले त्यानंतर पायदळ मोर्चा काढून तहसील कार्यालयामध्ये युवा मोर्चा व भाजयुमो विद्यार्थी आघाडी च्या माध्यमातून राईंचवार तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना आशिष देवतळे बोलले महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाच्या पाठीचा कणा असलेला गरीब तरुण बेरोजगार विद्यार्थी आज मानसिक आणि आर्थिक संकटात सापडलेला आहे अनेक विद्यार्थी 25 व 26 सप्टेंबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या परीक्षा देण्याकरिता स्वतःच्या गावाहून दुसऱ्या गावी गेले आणि जेव्हा विद्यार्थ्यांना कळले की त्यांची परीक्षा रद्द झाली तेव्हा सरकारच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.यावर विद्यार्थ्यांची झालेली आर्थिक नुकसान भरपाई विद्यार्थ्यांना परत द्यावी व परीक्षा ची तारीख घोषणा करावी अन्यथा महाराष्ट्रात सर्वत्र विद्यार्थ्यांच्या माध्यमातून युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल अशी चेतावणी सरकारला दिली.याप्रसंगी भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, ट्रान्सपोर्ट आघाडी तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा,भाजयुमो जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, भाजयुमो विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतीक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, सुजित निर्मल,मनीष रामीला,मोहित डंगोरे,श्रीकांत उपाध्याय,अशोक सोनकर, रिंकू गुप्ता,प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी,शुभम बहुरिया, राजू निषाद,श्रवण मोगरम,आकाश ननावरे, अविनाश आधे, कधीर भाई,कौसर भाई तसेच अनेक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन संपन्न झाले.