महाज्योतीच्या 15 उमेदवारांचे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश

महाज्योतीच्या 15 उमेदवारांचे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश

Ø महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले उत्तीर्ण उमेदवारांचे अभिनंदन

चंद्रपूर दि. 25 सप्टेंबर : सन 2019 साली स्थापित झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था  (महाज्योती) मार्फत उमेदवारांना सन 2020-21 करीता यूपीएससीच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरीता एकूण 52 उमेदवारांना अर्थसहाय्य करण्यात आले होते. त्यापैकी 15 उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. महाज्योतीची सुरुवात होऊन एक वर्ष झाले असतांना महाज्योती मार्फत प्रायोजित केलेल्या एकूण 15 उमेदवारांनी युपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याने इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भावी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच महाज्योतीचे संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक यांनी देखील परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांचे अभिनंदन केले असून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर हि इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागास वर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातील उमेदवारांना यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.
ही आहेत यश संपादित करणाऱ्या उमेदवारांची नावे:
महामुनी विनायक प्रकाशराव रॅंक-95, खांडेकर कमलकिशोर देशमुख रॅंक-137, जुईकार प्रतीक चंद्रशेखर रॅंक-177, वाणी श्रीराज मधुकर रॅंक-430, जाधव शुभम पांडुरंग रॅंक-445, राऊत अमर भीमराव रॅंक-449, नागरगोजे शुभम भाऊसाहेब रॅंक-453, दुधल अभिषेक दिलीप रॅंक-469, मोडक श्रीकांत रामराव रॅंक-499, मुंडे यशवंत अभिमन्यु रॅंक-502, पवार बनकेश बाबाराव रॅंक-516, अल्ताफ महमद शेख रॅंक-545, खान असिम किफायत खान रॅंक-558, म्हेत्रे सायली नारायण रॅंक-559 व पालवे विकास बालासाहेब रॅंक-587 या उमेदवारांचा समावेश आहे.