आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 6 सप्टेंबर: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयांतर्गत सन 2021-22 या वर्षाकरिता शबरी  आदिवासी घरकुल लक्षांक प्राप्त झाले असून प्रकल्पांतर्गत, चिमूर, नागभिड, ब्रम्हपूरी, वरोरा व भद्रावती या 5 तालुक्यातील गरजू आदिवासी लाभार्थ्यांकडून शबरी आदिवासी घरकुल योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेचे अर्ज शासकीय आश्रम शाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह तसेच कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहेत.
आदिवासी लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृहातील मुख्याध्यापक, गृहपाल तसेच कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावे. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र गाव नमुना 8-अ, ग्रामसभेचा ठराव, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकखाते पासबुकची झेरॉक्स, इलेक्ट्रिक बिल, राशनकार्ड, रहिवासी दाखला, घरटॅक्स, पाणीपट्टी पावती, विधवा घटस्फोटित असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र, सद्यस्थितीत राहत असलेल्या घराचा फोटो, नजीकच्या काळातील पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज दि. 8 ऑक्टोबर 2021 च्या आत प्रकल्प कार्यालयात पोहोचतील याप्रमाणे सादर करावे व शबरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.