बल्लारपुर साठी टाटा समूहाच्या माध्यमातून 15 बेड , 16 ऑक्सिजन पॉइंट व इतर महत्वपूर्ण उपकरणे मंजूर

बल्लारपुर साठी टाटा समूहाच्या माध्यमातून 15 बेड , 16 ऑक्सिजन पॉइंट व इतर महत्वपूर्ण उपकरणे मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकाराचे फलित

कोरोनाची तीसरी संभाव्य लाट लक्षात घेता आपल्या मतदार संघातील आरोग्य संस्था आरोग्य सेवेसाठी सज्ज राहव्या या दृष्टीने विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार बल्लारपुर नगर परिषदेला टाटा एज्यूकेशन व डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या सीएसआर निधीच्या माध्यमातून माध्यमातून 15 बेड , 16 ऑक्सिजन पॉइंट व इतर महत्वपूर्ण उपकरणे मंजूर करविली आहे. सदरचे साहित्य कळमना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वापरून ऑक्सिजन सुविधायुक्त कोरोना केअर सेंटर तयार करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटे दरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या बल्लारपुर मतदार संघासह सम्पूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात आरोग्य सुविधा पुरविणयासह सेवाकार्य केले. मास्क , ऑटोमेटिक सैनिटाइजर मशीन , ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटर, रुग्णवाहिका, कोविड केअर सेंटर , पीपीई किट , कोविड रुग्णालय , मोठे व लहान व्हेन्टीलेटर आदिंच्या उपलब्धतेसाठी आ. मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले व यश प्राप्त केले. लॉक डाउनच्या काळात देखील गरीब नागरिकांसाठी भोजन व्यवस्था ,जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वितरण, रुग्णाची ने आण करण्यासाठी रूग्णवाहिकांची सोय , रक्तदान शिबिरे असे विविध माध्यमातून सेवाकार्य आ. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीने राबविले .
कोरोनाची तीसरी लाट येण्याचा धोका वारंवार मुख्यमंत्री , टास्क फोर्स यांनी वर्तविला आहे. ही लाट उद्भवु नये हीच प्रत्येकाची भावना आहे. जरी लाट आली नाही तरी आपल्या मतदार संघातील आरोग्य संस्था सुसज्ज असाव्या या भावनेतून आ. मुनगंटीवार यांनी टाटा एज्यूकेशन व डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून 15 बेड , 16 ऑक्सिजन पॉइंट,3 बीपी ऍप मशीन , 3 बीपीएल अल्ट्रा प्राइमा मशीन, व्हेन्टीलेटर विथ स्टैन्ड 1 ही महत्वपूर्ण उपकरणे मंजूर करविली आहे. त्यांच्या या पुढाकाराने बल्लारपुर मतदार संघ तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवल्यास त्याचा सामना करण्यास सज्ज झाला आहे.