विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

चंद्रपूर, ता. २५ : चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या मूलभूत विकास निधीअंतर्गत विठ्ठल मंदिर प्रभाग १५ मधील काँक्रीट रस्त्याच्या आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन २५ ऑगस्ट रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडले.
विठ्ठल मंदिर प्रभाग १५ मधील बावीस चौक ते गणपती मंदिर ते विठठ्ल मंदिरपर्यंत काँक्रीट रस्ता आणि नाली बांधकाम मूलभूत विकास निधीअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यासाठी १२०. ६० लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती रवी आसवानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर राहुल पावडे, प्रभागातील नगरसेविका सीमा रामेडवार, नगरसेवक विशाल निंबाळकर, नगरसेविका संगीता खांडेकर, नगरसेवक प्रशांत दानव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला दिलीप रामेडवार, राजेंद्र खांडेकर, धनंजय हूड, सूर्यकांत कुचनकर, सचिन कोतपेल्‍लीवार, विनोद शेरकी, बिंदूभाऊ बडकेलवार, राजू बनकर, सुधाकर बनकर, भैयाजी तपासे, किशोर घुमडे, राजू जोशी, मोरेश्वर येरेवार आदी उपस्थित होते.