25 व 26 ऑगस्ट रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

25 व 26 ऑगस्ट रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय

ऑनलाईन रोजगार मेळावा

चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे दि. 25 व 26 ऑगस्ट 2021 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा व वेबिनारचे आयोजन

 

करण्यात आले आहे. तरी इच्छुक युवक-युवतींनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करावी किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केली असेल त्या उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावर अप्लाय करावे. उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा प्ले-स्टोअर मधून महास्वयम अप्लिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे व एम्प्लॉयमेंट वर क्लिक करावे. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने लॉगिन करावे. आपल्या होम पेज वरील पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाइन जॉब फेअर हा पर्याय निवडावा. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा निवडावा व फिल्टर बटणावर क्लिक करावे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर-2 या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुसऱ्या बटणावर क्लिक करावे तसेच आय ॲग्री हा पर्याय निवडावा. शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांचा अप्लाय बटणावर क्लिक करावे.

सर्व  उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉगिन करून दि. 25  व 26 ऑगस्ट 2021 रोजी वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदाकरिता उद्योजकांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट, व्हिडिओ कॉलिंग इत्यादीच्या माध्यमातून संपर्क साधून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील.

फेसबुक द्वारे ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

दि. 25 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती या विषयावर फेसबूकद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्रामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी उमेदवारांनी फेसबुक ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्याकरीता चंद्रपूर रोजगार या फेसबुक प्रोफाइलला भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळावा व फेसबुक ऑनलाईन सत्राचा लाभ घ्यावा, असे कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.