सद्भावना दिवस साजरा करून प्रतिज्ञा घेण्यात आली.

सद्भावना दिवस साजरा करून प्रतिज्ञा घेण्यात आली.

भंडारा – पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथील प्रांगणात आज दिनांक २०/८/२०२१ रोजी पोलीस अधीक्षक भंडारा वसंत जाधव , अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सद्भावना दिवस साजरा करून प्रतिज्ञा घेण्यात आली.
” मी अशी प्रतिज्ञा घेतो की, मी जात, वंश ,धर्म ,प्रदेश किंवा भाषा विषय भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की ,आमच्या मधील वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार करून संविधानिक मार्गाने सोडवीन “
यावेळी कार्यक्रमाला प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर .व्ही .थोरात ,डोंगरे ,पोलीस निरीक्षक बनसोड , पोलीस निरीक्षक चव्हाण हानी गुन्हे शाखा भंडारा , पोलीस निरीक्षक तेलुरे , पोलीस निरीक्षक कदम वानिशा भंडारा , पोलीस निरीक्षक पाटील मोटार परिवहन विभाग भंडारा , पोलीस उपनिरीक्षक कोडी सीसीटीएनएस भंडारा , पोलीस उपनिरीक्षक उके जिवीशा भंडारा , राखीव पोलीस उपनिरीक्षक सिंग पो.मु.भंडारा , तसेच पोलीस अधिकारी / कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.