लोकसभा क्षेत्राचा विकास हाच माझा ध्येय यासाठी सदैव प्रयत्नशील – खासदार अशोक नेते

लोकसभा क्षेत्राचा विकास हाच माझा ध्येय यासाठी सदैव प्रयत्नशील – खासदार अशोक नेते

सावली तालुक्यातील मौजा- निमगांव येथे श्री.बाल गणेश मंडळाच्या सौजन्याने खास वसंत पंचमीच्या मंडई निमित्याने दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोज बुधवार ला दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सामाजिक, लावणी प्रधान तिन.अंकी नाटयपुष्प संगित:-कलंकित ठरलय तुझं मातृत्व या नाटकाचे आयोजन करण्यात आले.या नाटकाचे
उदघाटन खासदार अशोक ‌नेते यांच्या शुभहस्ते फीत कापुन करण्यात आले.

या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी म्हणून खासदार अशोक नेते यांनी बोलतांना आपल्या सावली तालुक्यातील मौजा- निमगांव येथे नाटयप्रेमी, नाटय रसिक जनतेशी संवाद साधतांना नाटक हा समाज प्रबोधनाचे माध्यम आहे.या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी मला बोलावले या निमित्याने मी आपणांला जाता जाता एवढेच सांगीण की,लोकसभा क्षेत्राचा विकास हाच माझा ध्येय असून प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळवून देण्यात माझा सदैव प्रयत्न राहिल.या नाटकाचा चांगल्या तऱ्हेन आस्वाद घ्यावा.व चांगले उदबोधन घ्यावा. असे या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी प्रतिपादन केले.

या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी..
*ओबीसी समाज घटका संबंधित मान्यवरांनी आपले विचार मांडतांना*

जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुक्याचे ओबीसी नेते कविंद्र रोहणकर ह्या मान्यवरांनी ओबीसी समाज घटकासंबंथीत विचार व्यक्त करत ओबीसी समाज बांधवांनी काय केले पाहिजे.ओबीसी समाजाच्या हितासाठी, आरक्षणासाठी सतत लढा देत,संघर्ष केला पाहिजे यावर विस्तृत माहिती देत
मराठा समाज एकत्रीत येऊन जसा लढतो.तसाच जर आपण ओबीसी समाजासाठी एका छताखाली येऊन एकत्र लढलो तर या झोपलेल्या ओबीसी समाजाला जागृतता निर्माण होईल.यासाठी संपुर्ण ओबीसी समाज बांधव एक दिलाने,एक मनाने,एकत्रीत येणे गरजेचे आहे. अजूनही आपल्या ओबीसी समाजाचे एकत्रीत विचार, एकत्रीत बैठक,चिंतन, मनन होणे आवश्यक असून ह्या ओबीसी लढ्यामध्ये कुणबी, तेली, माळी,ढिवर,नाव्ही,धोबी,कुंभार, लोहार,पंचाळ,गांडली, अशा विविध समाज घटकांतील ओबीसी बांधव एकत्रीत एकाच छताखाली येऊन मराठयांप्रमाणे लढा दिला पाहिजे तरच आपली ओबीसी समाजाची एकत्रित ताकत निर्माण होईल व दिसून येईल.असे वक्तव्य यावेळी नाटकाच्या मंचावर मान्यवरांनी केले.
यावेळी माजी बांध. सभापती संतोष भाऊ तंगडपलीवार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,माजी बांध. सभापती संतोष भाऊ तंगडपलीवार,भाजपा कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,भाजपा जेष्ठ नेते अरुण पाल,तालुका ओबीसी मोर्चाचे नेते कविंद्र रोहणकर, माजी.पं.स.उपसभापती रविंद्र बोलीवार,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे,बुथ प्रमुख अभय लाटकर, धान्य व्यापारी संतोष थोराक, महिला आघाडी च्या नेत्या प्रतिभाताई बोबाटे,मुक्तेश्वर थोराक, पुनम झाडे,डियेज आभारे,किशोर खेडेकर,ज्ञानेश्वर भोयर,सुरेश हूलके,जितेंद्र धात्रक,अरुण बारसागडे,रजूताई जूनघरे,शालुताई लाटकर, डॉ.गेडाम साहेब,तुळशीदास भुरसे,तसेच मोठ्या संख्येने नाटय रसिक उपस्थित होते.