पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि.19ऑगस्ट : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 शुक्रवार दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी, सकाळी 10.45 वाजता गोसेखुर्द विश्रामगृह, ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 11 वाजता गोसेखुर्द विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करणे, उपसा सिंचन योजना, कालव्याची दुरुस्ती याबाबत संबंधित अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता ब्रह्मपुरी येथून बोळधा त. ब्रह्मपुरीकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता बोळधा येथे आगमन व आनंदराव पाटील ठाकरे यांच्याकडे सांत्वनपर भेट. दुपारी 2 वाजता एकारा ता. ब्रह्मपुरी येथे आगमन व श्री. मुसळे यांच्याकडे सांत्वनपर भेट. दुपारी  2.15 वाजता एकारा येथे ब्रह्मपुरी-एकारा-सिंदेवाही रस्त्यावरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 3.15 वाजता एकारा येथून मेंडकीकडे प्रयाण व रामनगर टोली येथील सभागृहाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

सायंकाळी 3.45 वाजता वनविभाग विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन. सायंकाळी 4 वाजता वनविभाग विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे हिस्रं वन्यप्राण्यांमुळे नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.

रविवार दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी, दुपारी 12.30 वाजता  गुंजेवाही येथे आगमन व श्री. जयस्वाल यांच्याकडे सांत्वनपर भेट. दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता सिंदेवाही तालुक्यातील विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. सायंकाळी 3 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा अभ्यांगताना भेट. सायंकाळी 4 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.