असोलामेंढा प्रकल्पातून आवश्यकतेनुसार सिंचनाकरिता नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार

असोलामेंढा प्रकल्पातून आवश्यकतेनुसार सिंचनाकरिता

नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार

चंद्रपूर दि. 18ऑगस्ट : नैसर्गिक पावसाच्या अभावी असोलामेंढा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता दि. 14 जुलै ते 23 जुलै 2021 पर्यंतच्या कालावधीत 7.298 द.ल.घ.मी पाणी सोडण्यात आले असून दि. 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या कालावधीत सिंचनाकरिता 21.030 द.ल.घ.मी पाणी सोडण्यात आले आहे.

 तसेच सद्यस्थितीत सिंचनाकरिता असोलामेंढा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी देणे सुरू असून असोलामेंढा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील 95 टक्के रोवणी ही असोलामेंढा प्रकल्पाच्या पाण्यामुळे झाली आहे. तसेच यापुढेही आवश्यकतेनुसार सिंचनाकरिता नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी शेतकरी बांधवांनी याबाबत कोणतीही शंका बाळगू नये. असे असोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.