पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि.17 ऑगस्ट : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार, दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन

सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक.  (ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर बफर झोन मधील योजनांवर कामांचा आढावा, जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या नवीन व्याघ्रप्रकल्पातील योजनेचा आढावा. याव्यतिरिक्त जंगलातील योजनांचा कामाचा आढावा.)

दुपारी 12 वाजता  ब्रह्मपुरी तालुक्यातील पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक. ( ब्रह्मपुरी तालुक्यातील नवीन गावांचे पुनर्वसन व पुरामुळे बाधित होत असलेल्या गावाचे पुनर्वसन व त्यातील समस्येबाबत.)

दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, चंद्रपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्याची आढावा बैठक. (पालकमंत्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली कामे, नवीन कामे, निधी याबाबत आढावा.) दुपारी 1 वाजता चंद्रपूर शहरातील बाबुपेठ उड्डाण पुलाबाबत आढावा बैठक. दुपारी 1:30 वाजता चंद्रपूर शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत आढावा बैठक. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी संदर्भात आढावा बैठक. दुपारी 3  वाजता चंद्रपूर शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.