भंडारा : जिल्हा नियोजन भवन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा नियोजन भवन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भंडारा,दि.8:- जिल्हा नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते झाले. खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, आमदार नाना पटोले, आमदार नागो गाणार, डॉ. परिणय फुके, ॲड. अभिजित वंजारी, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन भवन इमारतीच्या बांधकामासाठी रुपये 2 कोटी 93 लक्ष खर्च करण्यात आला. तर इमारतीमध्ये फर्निचरसाठी रुपये 1 कोटी 55 लक्ष रुपये खर्च करण्यात आले. जिल्हा नियोजन कार्यालयाला सुसज्ज अशी इमारत उपलब्ध झाली आहे.