बालगृहांतील २०९ विद्यार्थ्यांनी १२वी उत्तीर्ण

बालगृहांतील २०९ विद्यार्थ्यांनी १२वी उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी या मुलांचे कौतुक केले. जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे- ॲड. ठाकूर