भंडारा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले

भंडारा,दि.6:- 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी उत्तीर्ण झालेल्या सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या मांग, मातंग व तत्सम समाजातील 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेकरिता 12 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.

विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, रेशनकार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादी सह अर्ज दोन प्रतीत  आपले पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह 12 ऑगस्ट 2021 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे सादर करावे, असे जिल्हा व्यवस्थापक दिलीप खडसे यांनी कळविले आहे.