गडचिरोली : महसूल विभाग प्रशासनाचा कणा -जिल्हाधिकारी दीपक सिंगला

महसूल विभाग प्रशासनाचा कणा -जिल्हाधिकारी दीपक सिंगला

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन साजरा

गडचिरोली,(जिमाका)दि.01 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून विकासाकरिता वातावरण निर्मिती महसूल विभाग करतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिगला यांनी केले. ते महसूल दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाला महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत आर्थिक वर्ष असते. तसेच 1 ऑगस्ट ते 31 जुलै महसूली वर्ष मानले जाते. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसूली यांचा ताळमेळ घालण्याचे काम महसूल विभागा कडुन केले जाते. राज्यात 2002 च्या परिपत्रकानुसार महसूल दिन साजर केला जात आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसूली यंत्रणे मार्फत केले जाते. याचवेळी प्रामुख्याने लोकांशी निगडीत विविध महसूली तसेच विकास योजनाची माहिती गावस्तरावर पोहचविण्याचे कार्य महसूल विभाग करतो.

यावेळी अधिकारी व कर्मचारी यांना विशेष कामगिरी करीता प्रमाणपत्र देण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी भुषविले. तसेच यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर, कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे, उपजिल्हाधिकारी निवडणुक कल्पना ठुबे, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर उपस्थित होते. यावेळी महसूल दिनी अधिकारी व कर्मचारी वृंदही उपस्थित होते.
या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तहसिलदार महेंद्र गणवीर यांनी प्रस्ताविक केले. निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक)कल्पना निळ -ठुबे, तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन महसूल दिनाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गांना शुभेच्छा दिल्या. या महसूल दिनी महसूल विभागात काम केलेल्या उत्कृष्ठ अधिकारी कर्मचारी वर्गांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी आपले मनोगत सांगून पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने चांगले काम केले असून महसूल विभाग सर्व कामे करत असतो ही अभिमानाची बाब आहे असे म्हणाले. यावेळी आभार प्रदर्शन कुरखेडाचे तहसिलदार श्री. माळी यांनी केले.

प्रशस्तीपत्र देऊन यांना केले सन्मानित – 1.समाधान शेडगे उपविभागीय अधिकारी कूरखेडा 2. महेंद्र गणवीर तहसीलदार गडचिरोली 3.कल्याणकूमार डहाट तहसीलदार आरमोरी 4.सोमनाथ माळी तहसिलदार कूरखेडा 5. अनमोल कांबळे नायब तहसीलदार भामरागड 6.हमीद सय्यद नायब तहसीलदार सिरोंचा
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून,महसूल सहायक, शीपाई
यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तहसिल कार्यालय गडचिरोली येथील
नायब तहसिलदार नारायण दांडेकर, दिपक गट्टे यांचा सत्कार केला. सत्यनारायण अनमदवार , ज्येेाती तायडे, अव्वल कारकून, मारोती कूळमेथे ,महेश चूनारकर, महसूल सहायक, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पियूष आखाडे,अल्पेश बारापात्रे,
शिपाई – अंजना सोनकूसरे, साधना जूमनाके तलाठी भूषन जवजांळकर, विकास कूमरे, निशांत भानारकर, गणेश खांडरे, कोतवाल -सोमलकर,यामीनी सडमेक यांचाही यावेळी सन्मान केला गेला.