चंद्रपूर : सलून व्यावसायिकांसाठी शनिवार व रविवार ला दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात यावी.

सलून व्यावसायिकांसाठी शनिवार व रविवार ला दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात यावी. –

नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी यांची मागणी

बातमी संकलन – सुरज सूर्यवंशी , ब्रम्हपुरी

मागील एक दीड वर्षापासून कोरोणा महामारी मुळे लहान व्यावसायिकांचे पार कंबरडे मोडले असताना राज्य सरकारने पुन्हा राज्यात निर्बंध लावत सप्ताह मध्ये शनिवार व रविवार ला बंद व वेळेची मुदत दिलेली आहे . त्यामुळे सलून व्यावसायिकांना याच भारीच नुकसान होत आहे.कारण सलून व्यावसायिकांसाठी रविवार हा सप्ताह मधील धंद्याचा सर्वात मोठा दिवस असतो. आणि नेमके त्याचं दिवशी बंद असल्यामुळे भारीच नुकसान होत आहे.
म्हणून सरकारने या निर्णयात फेरबदल करुन आज ब्रम्हपुरी मधील नाभिक युवा आघाडी ब्रम्हपूरी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देन्यात आले. सलुन व्यावसायिकांना शनिवार व रविवार ला दुकाने सुरू करण्याची मुभा देण्यात यावी …
असे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना नाभिक युवा आघडीचे सचिव गोलू फुलबांधे, अध्यक्ष विलास सूर्यवंशी, मार्गदर्शक अजय खलसिगे, विलास दाणे, प्रसिद्धी प्रमुख मयुर मेश्राम, अन्य सदस्य गणं उपस्थित होते .