मच्छिमार कास्तकारांनी अपघात गट विमा योजनेचा लाभ घ्यावा.

मच्छिमार कास्तकारांनी अपघात गट विमा योजनेचा लाभ घ्यावा

भंडारा, दि. 9 : मत्सव्यवसाय विभागामार्फेत अपघात गट विमा योजना राबविण्यात येत आहे. परंतु, मत्सव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य यांना वेळोवेळी लेखी तसेच आयोजित सभेत कळविण्यात आल्यानंतरही अपघात गट विमा योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सर्व मच्छिमार कास्तकारांनी अपघात गट विमा योजनेचा लाभ घ्यावा. तसेच 12 जून 2023 पर्यंत मत्सव्यवसाय सहकारी संस्थेची माहिती सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय कार्यालय, भंडारा येथे सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय उ. व. सबनीस यांनी केले आहे.