गडचिरोली : शिवसेनेच्या दणक्याने देसाईगंज वीज वितरण कंपनीने तालुक्यातील स्ट्रीट लाईट केले सुरू

शिवसेनेच्या दणक्याने देसाईगंज वीज वितरण कंपनीने तालुक्यातील स्ट्रीट लाईट केले सुरू

बातमी संकलन – पंकज चहांदे
देसाईगंज- शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी वीज वितरण कंपनी ला २४ तासाची वीज जोडणी साठी मुदत दिली होती, आज दि. २२ जुलै २०२१ गुरुवार ला १ वाजता जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व देसाईगंज तालुक्यातील शिवसैनिक येथील वीज वितरण च्या कार्यालयात धडकले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता साळवे यांना घेराव घालून निवेदन दिले व ताबडतोब संपुर्ण तालुक्यातील स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी करण्याबद्दल चर्चा केली, यावेळी साळवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ताबडतोब आपल्या कर्मचाऱ्यांना तालुक्यातील वीज जोडणी करण्यास सांगितले, तसेच कृषी पंप धारकांनी त्याचे चालू रनिग बिल भरल्यास वीज तोडणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्यासह उपजिल्हाप्रमुख भरत जोशी, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, कुरुड येथील सरपंचा प्रशाला गेडाम, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, आमगाव सरपंचा बोदेले ताई, उपसरपंच प्रभाकर चौधरी, पोटगावचे सरपंच विजय दडमल, शंकरपूर सरपंच वालदे , उपसरपंच पंकज वंजारी, किन्हाळा येथील सरपंचा श्रीरामेताई, माजी जिप सदस्य डिगाम्बरजी मेश्राम, तालुका प्रमुख विजय सहारे, शिवराजपूर उपसरपंच रमेश वाढई, माजी तालुकाप्रमुख नंदुभाऊ चावला, बालाजी ठाकरे, विठ्ठल ढोरे, माजी शहरप्रमुख विकास प्रधान, महेंद्र मेश्राम व देसाईगंज तालुक्यातील शिवसैनिक हजर होते.